16 May, 2023

 अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्य शासनाच्या www.mahadbt.maharashtra.gov.in  या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षाखाली विविध केंद्र पुरस्कृत  योजना आहेत. त्याअंतर्गत अनुदानावर गट प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उपलब्ध असलेल्या बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोयाबीन, मूग, उडीद, तूर इत्यादी पिकांच्या बियाणे मागणीसाठी प्राप्त अर्जामधून सोडत काढण्यात येणार आहे. प्राप्त अर्जामधून ज्या शेतकरी बांधवांची सोडतीद्वारे निवड होईल त्यानांच पिक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळणार आहे. या कामासाठी शेतकरी स्वत: अथवा आपल्या जवळच्या सीएससी केंद्राची मदत घेऊन अर्ज करु शकतात.

यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी  पोर्टवरील शेतकरी योजना शीर्षकाअंतर्गत बियाणे घटकाचा  लाभ  घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: