31 May, 2023

 

 शासकीय कार्यालय व विविध आस्थापनांमध्ये हेल्मेट सक्ती

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 31 : राज्य परिवहन आयुक्तांनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी  तसेच  वरील आस्थापनेत  येणाऱ्या सर्व दुचाकीस्वारांविरुध्द संरक्षक शिरस्त्राण (हेल्मेट)  सक्ती केली आहे.

हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्तीविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 129/177, 255 (1) नुसार तसेच कलम 194(3) अन्वये संबंधित आस्थापना प्रमुख यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करुन त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यासाठी निलंबित करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, नगरपालिका व सर्व शासकीय आस्थापना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी तसेच वरील आस्थापनेत येणाऱ्या दुचाकी वाहन चालक, मालक यांनी शासकीय कार्यालय व विविध आस्थापनेच्या कार्यक्षेत्रात दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटसह प्रवेश करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. अन्यथा आपणाविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे अनंता जोशी , उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: