18 May, 2023

 

वसमत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत वसमत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींनी अर्ज सादर करावेत.  या वसतिगृहात अल्पसंख्यांक मुलींसाठी 70 टक्के व बिगर अल्पसंख्यांक मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत.

इच्छूक मुलींनी प्रवेश अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत भरुन अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत जि.हिंगोली येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी अल्संख्यांक मुलींचे वसतीगृह, वसमत येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत जि. हिंगोली यांनी केले आहे.  

*****

No comments: