02 May, 2023

 

जागतिक मधमाशा दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर जि.सातारा येथे जागतिक मधमाशा दिनाचे औचित्य साधून मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या लाभार्थ्यांना दि. 20 मे, 2023 रोजी मधमाशी मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे हा वितरण सोहळा दि. 20 मे, 2023 रोजी मधसंचालनालय, महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे.

यासाठी मधमाशा उद्योगामध्ये सातेरी मधमाशा, मेलिफेरा मधमाशा व आग्या मधमाशाचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्याकडून पुरस्काराची निवड करण्यासाठी दि. 05 मे, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, प्रशासकीय इमारत कक्ष क्र. 11, नांदेड रोड, हिंगोली  यांच्याशी संपर्क साधावा. अधिक महितीसाठी बाबूराव मेघा राठोड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी व एस. पी. बगाडे, मधुक्षेत्रिक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, प्रशासकीय इमारत, हिंगोली यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. 8208535211 व 9822528534 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: