17 May, 2023

 

पारधी समाजातील लाभार्थ्यांनी विविध योजनेसाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : पारधी विकास योजना सन 2022-23 अंतर्गत पारधी समाजातील महिला, पुरुष बेरोजगार लाभार्थ्याकडून वैयक्तीक लाभाच्या लाभार्थ्यांना पीठ गिरणी वाटप करणे, बेरोजगार लाभार्थ्यांना हळद ढोल करण्याचे मशीन, हळद कुकर मशीन वाटप करणे, बेरोजगार पुरुष लाभार्थ्यांना तीनचाकी, चारचाकी वाहनासाठी अर्थसहाय्य करणे तसेच महिला, पुरुष लाभार्थ्यांना किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य करणे या  विविध योजनेसाठी लाभार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध असून इच्छूक लाभार्थ्यांनी वरील पत्यावर परिपूर्ण कागदपत्रासह दि. 3 जून, 2023 रोजी सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

पारधी समाजातील  लाभार्थ्यांना महिला, पुरुष लाभार्थ्यांना पीठ गिरणी वाटप करणे, पारधी समाजातील बेरोजगार लाभार्थ्यांना हळद ढोल करण्याचे मशीन, हळद कुकर मशीन वाटप करण्यासाठी लाभार्थी पारधी समाजाचा असावा, जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड तसेच यापूर्वी लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

तसेच पारधी समाजातील बेरोजगार पुरुष लाभार्थ्यांना तीनचाकी, चारचाकी वाहनासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी  लाभार्थी पारधी समाजाचा असावा, वाहनचालक परवाना, जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, शैक्षणिक पात्रता 7 वी पास तसेच यापूर्वी लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.  

पारधी समाजातील महिला, पुरुष लाभार्थ्यांना किराणा दुकानासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी लाभार्थी पारधी समाजाचा असावा, जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, दुकानासाठी जागा असल्याचा पुरावा  तसेच यापूर्वी  लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणा प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

वरील पीठ गिरणी वाटप करणे, हळद ढोल करण्याचे मशीन, हळद कुकर मशीन वाटप करणे या तीन योजनापैकी एकाच योजनेसाठी अर्ज करावे. जर दोन्ही योजनेसाठी अर्ज केला असल्यास कमी लाभाच्या योजनेचा अर्ज रद्द करण्यात येईल. योजना रद्द करण्याचे, बदल करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी राखून ठेवलेले आहेत, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: