11 May, 2023

 

अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांनी विहीर व सोलार पंपासाठी

24 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 11 :  विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत अनुसूचित जमातीच्या वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वन पट्टे प्राप्त असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीचया उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर घेणे व सोलार पंप बसविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध असून इच्छूक लाभार्थ्यांनी वरील नमूद पत्त्यावर परिपूर्ण कागदपत्रासह दि. 17 मे, 2023  ते 24 मे, 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप , कळमनुरी जि.हिंगोली यांनी केले आहे.

            या योजनेसाठी वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणारा आदिवासी शेतकरी असावा. वनपट्टे प्राप्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, 2023 या वर्षातील उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र (स्वयंघोषित), आधार कार्ड छायांकित प्रत, आधार जोडणी असलेले अर्जदाराचे बँक पासबूक, अर्जदाराचे पासपोर्ट साईज दोन फोटो, जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र, विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र, विधवा महिला शेतकरी, अपंग शेतकरी असल्यास विधवाचे प्रमाणपत्र, अपंगाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

*****

No comments: