04 May, 2023

 

जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची कार्यक्रमांतर्गत

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी सेवायोजन कार्ड नोंदणी मोहिमेचे आयोजन

                                                                                                             

            हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली यांच्यामार्फत .  जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 8 मे ते 12 मे, 2023 पर्यंत सेवायोजन कार्ड नोंदणी (एम्प्लॉयमेंट कार्ड रजिस्ट्रेशन) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी लाभ घ्यावा. या नोंदणीमुळे आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील ऑनलाईन किंवा ऑफलाईन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार सहभाग घेता येणार आहे. रिक्त पदे  https://rojgar.mahaswayam.gov.inwww.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली जातात.  या पदाचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सेवायोजन कार्डाची (एम्प्लॉयमेंट कार्ड) आवश्यकता असते. त्यासाठी आपण कार्यालयीन वेळेत दि. 8 मे ते दि. 12 मे, 2023 रोजी पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा माळा, हिंगोली येथे आधार कार्ड, टीसी झेरॉक्स, सर्व शैक्षणिक कागदपत्राची झेरॉक्स, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी आदी कागदपत्रासह येऊन नोंदणी पूर्ण करुन घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी 7972888970 किंवा 7385924589 या भ्रमणध्वनी  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

*****

No comments: