हिंगोली (जिमाका), दि. 06 : हिंगोली जिल्ह्यात पोलीस पाटलाची
647 पदे मंजूर असून, 343 पदे रिक्त होती. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राबविण्यात
आली आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यातील काहींना प्रातिनिधीक
स्वरुपात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नियुक्ती आदेश वितरीत करण्यात
येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या
मुलाखतीनंतर तात्पुरत्या निवडीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोमवार, दि. 02 रोजी
www.Hingolipp.recruitonline.in या संकेतस्थळावर
प्रकाशित करण्यात आली होती. दि. 4 व 5 फेब्रुवारी, 2025 रोजी निवड झालेल्या उमेदवारांच्या
विविध पथकामार्फत कागदपत्राची पडताळणी करुन त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील 343 रिक्त पदांमध्ये हिंगोली
तालुक्यातील 76, सेनगाव 65, कळमनुरी 89, वसमत 57 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 56 पदांचा
समावेश आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस पाटील पदासाठी गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी
दि. 1 ते 5 जानेवारी, 2026 दरम्यान जाहीर नोटीस
प्रसिद्ध करण्यात आली होती. या आरक्षणावर 6 ते 7 जानेवारी, 2026 या दोन दिवसात आक्षेप
मागविण्यात आले होते. त्यानंतर दि. 8 ते 10 जानेवारी, 2026 या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध
करुन दि. 12 ते 26 जानेवारी, 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दि. 27 ते 30 जानेवारी,
2026 या दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी करुन अर्जदारांना प्रवेशपत्रे वाटप करण्यात
आले होते.
हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पदांसाठीची लेखी परीक्षा 21 केंद्रांवर
दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी शांततेत व शिस्तबद्धरित्या घेण्यात आली. या परीक्षेसाठी
4 हजार 639 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 4 हजार 472 अर्ज पात्र ठरले होते.
दि. 8 फेब्रुवारी, 2026 रोजी झालेल्या परीक्षेसाठी 4 हजार 379 उमेदवार उपस्थित राहिले, तर 93 उमेदवार
गैरहजर होते.
प्रथम उत्तरतालिका दिनांक 8 फेब्रुवारी
2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिकेबाबत लेखी आक्षेप
व हरकती सादर करण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित
उपविभागीय अधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
अंतिम उत्तरतालिका दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात
येऊन त्याच दिवशी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत पात्र
ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी
2026 या कालावधीत विविध पॅनलच्या माध्यमातून पार पडल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment