हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यातील
सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी
घेण्यात आलेल्या “समुह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख)
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025” या परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी
प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3
व 4 फेब्रुवारी 2026 रोजी तीन सत्रांमध्ये
आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती प्रक्रियेकरिता
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी ) उत्तीर्ण असल्यास त्याबाबतची
माहिती सर्व उमेदवारांनी https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर दि. 16 मार्च ते 21 मार्च 2026 या कालावधीत ऑनलाईन भरावी.
ही माहिती केवळ दिलेल्या लिंकवरच सादर
करणे बंधनकारक असून ई-मेल, पत्राद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर केलेली
माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार
नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
दरम्यान, परीक्षेची गुणपडताळणी तसेच
रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून घेण्यासाठी
https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx या लिंकवर दि. 16 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
गुण पडताळणीसाठी प्रती पेपर रुपये 500 इतके शुल्क सदर लिंकद्वारे भरावे
लागेल. शुल्क भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित उमेदवारांच्या ई-मेलवर रिस्पॉन्स
शीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती ई-मेल, पत्र किंवा इतर
माध्यमांद्वारे सादर केल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच निश्चित मुदतीनंतर कोणतीही
मुदतवाढ दिली जाणार नसल्याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य
परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
*******
No comments:
Post a Comment