24 March, 2026

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शंभर दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन

 

हिंगोली (जिमाका),दि. 24 : जिल्हा परिषद हिंगोली येथे आज जागतिक क्षयरोग दिन साजरा करून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते एक्स-रे व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम अभियानाची सुरुवात करण्यात आली. 178 जोखीम ग्रस्त गावामध्ये एक्स-रे व्हॅन मार्फत एक्स-रे काढून तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी टी बी मुक्तची शपथ यावेळी देण्यात आली. आपला हिंगोली जिल्हा टी बी मुक्त करण्याण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समन्वय ठेवून प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी देऊन अभियान यशस्वी राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित बांगर, प्रशासकीय अधिकारी विठ्ठल भुसारे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. पोले,जिल्हा परिषद येथील कर्मचारी व जिल्हा क्षयरोग केंद्र येथील  रवींद्र घुगे जिल्हा पी पी एम समन्वयक बालाजी उबाळे, कार्यक्रम सहाय्यक श्री, पुंडगे,पर्यवेक्षक श्री दुधाडे, श्री. कुलकर्णी, पटीशन बनसोड, क्षयकिरण तंत्रज्ञ श्री. लोखंडे, श्री. डोल्हारे श्री. माने श्री बोरकर श्री जाधव इतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

****** 




No comments: