हिंगोली (जिमाका), दि. 23 : शासकीय संगणक
टंकलेखक बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षाशुल्क
प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र
विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दि. 30 एप्रिल,
2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी
केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात
ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येते. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा
निकाल दिनांक 10 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या
प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील अमृताच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोटी,
मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, आयगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा,
बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराती, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा,
कानडी इ.) विद्यार्थ्यांना परीक्षाशुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
यासाठी अर्जासोबत सन 2025-26 किंवा सन 2026-27 या आर्थिक वर्षातील
उत्पन्न प्रमाणपत्र अथवा इडब्ल्यूएस प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र,
लक्षित गटातील जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. टी.सी./एल.सी./शालेय निर्गम उतारा),
माहे जानेवारी 2026 परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशीलासाठी पासबुकची
प्रत किंवा रद्द केलेला धनादेश आदी कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत
आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या
जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment