·
जिल्ह्यातील 75 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टुडी-इको तपासणी, 10 विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी
संदर्भित
हिंगोली (जिमाका), दि. 16 : राष्ट्रीय
आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके)
अंतर्गत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील हृदयविकारग्रस्त संशयित विद्यार्थ्यांसाठी आज
सोमवार, (दि.16) रोजी येथील जिल्हा रुग्णालयात टुडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते.
या शिबिरामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत,
औंढा नागनाथ व सेनगाव या तालुक्यांतील 75 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची दुडी-इको तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 10 विद्यार्थ्यांना
शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले असून, त्यांची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा
फुले जनआरोग्य योजना व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत बालाजी हॉस्पिटल, मुंबई येथे मोफत
करण्यात येणार आहे.
या तपासणी शिबिरासाठी मुंबई येथील भायखळा येथील बालाजी हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री मिश्रा (कार्डियोलॉजिस्ट),
डॉ. प्रतिक मिश्रा व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांची तपासणी केली.
या शिबिराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय
अधीक्षक डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी,
बाल स्वास्थ्य डॉ. शैलेजा कुप्पास्वामी, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, भूलतज्ञ डॉ. नितीन
पुरोहित, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. अमोल देशमुख, बालरोग तज्ञ डॉ. नितीन अग्रवाल यांच्या
मार्गदर्शनाखाली पार पडले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बी.
चिंचकर, श्रीमती आशा क्षीरसागर, श्रीमती कदम, डॉ. मोसीन (आयुष्यमान भारत समन्वयक),
डॉ. संतोष नांदूरकर (डीईआयसी मॅनेजर), लक्ष्मण गाभणे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक),
ज्ञानोबा चव्हाण तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसीमधील वैद्यकीय अधिकारी,
औषधनिर्माते, एएनएम, कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका यांनी परिश्रम
घेतले.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांनी
या योजनेचा लाभ घेतला असून शस्त्रक्रिया व उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या
पालकांनी आरबीएसके कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
तसेच जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी
दैनंदिन जीवनात हृदयविकारासंदर्भात जागरूक राहून वेळोवेळी टुडी-इको तपासणी करून आजाराचे
वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले
आहे.
******
No comments:
Post a Comment