हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यातील मोटार सायकल संवर्गासाठी वापरात असलेली एमएच38-एएम ही वाहन क्रमांक मालिका संपुष्टात येत असल्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन एमएच38-एएन0001 ते 9999 ही मालिका सुरू करण्यात आली आहे. नवीन वाहन नोंदणी करताना ही नवीन मालिका लागू राहणार आहे.
तसेच ज्या वाहन मालकांना आपल्या वाहनासाठी आकर्षक (फॅन्सी) क्रमांक राखीव ठेवावयाचा आहे, त्यांनी संबंधित कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पद्धतीने विहित शासकीय शुल्क भरून इच्छित क्रमांक आरक्षित करून घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment