हिंगोली, दि.१४ (जिमाका): जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या साठ्याची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शनिवार, (दि.१४) रोजी बावनखोली येथील साई गॅस एंटरप्राइजेस तसेच लिंबाळा येथील हिंगोली गॅस एजन्सीच्या गोदामाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्ध साठ्याबाबत माहिती घेतली. तसेच रिकामे व भरलेले (रिफिल) गॅस सिलेंडर यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि पुरवठ्याची सद्यस्थिती याचा सविस्तर आढावा घेतला.
दोन्ही गॅस एजन्सींना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नागरिकांना सुरळीत व नियमितपणे करण्यात यावा, तसेच शासनाच्या नियमांनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा रुग्णालये, वसतिगृहे व इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
*****

No comments:
Post a Comment