हिंगोली (जिमाका), दि. 10 : आंतरराष्ट्रीय
महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च रोजी येथील तालुका क्रीडा संकुलावर अस्मिता महिला लीग
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील महिला
खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित मैदान गाजविले.
ही स्पर्धा केंद्र शासनाच्या मेरा युवा
भारत, युवा कार्यक्रम विभाग हिंगोली, खेलो इंडिया हिंगोली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
जिल्हा प्रशासन, शिक्षक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट व गाईड तसेच एनसीसी
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर
व 400 मीटर धावण्याच्या शर्यतींमध्ये खेळाडूंनी अटीतटीची लढत देत उत्कृष्ट कामगिरी
केली.
खुल्या गटातील स्पर्धेत 100 मीटर धावण्यात
पल्लवी पांचाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. 200 मीटरमध्ये आरती राठोड तर 400 मीटरमध्ये
वैष्णवी वाशिमकर हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
18 वर्षांखालील गटात 100 मीटर धावण्यात
पायल अशोक राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व प्राची काठाले (तृतीय) यांनी क्रमांक
मिळवले. 200 मीटरमध्ये पायल राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व आकांक्षा नरवाडे
(तृतीय) तर 400 मीटरमध्ये पायल राठोड (प्रथम), शुभांगी राठोड (द्वितीय) व कोमल नवले
(तृतीय) यांनी यश मिळवले. या गटात पायल राठोड व शुभांगी राठोड यांनी उल्लेखनीय कामगिरी
करत पदकांची कमाई केली.
13 वर्षांखालील गटात 100 मीटर धावण्यात
कल्याणी पवार (प्रथम), अश्विनी राठोड (द्वितीय) व रागिणी पतंगे (तृतीय) यांनी क्रमांक
पटकावले. 200 मीटरमध्ये कल्याणी अनिल पवार (प्रथम), मेघा लोणकर (द्वितीय) व अनुष्का
वायगाये (तृतीय) तर 400 मीटरमध्ये कल्याणी पवार (प्रथम), शर्वरी पोले (द्वितीय) व मीरा
नरवाडे (तृतीय) यांनी यश मिळवले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली नगर
परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा
क्रीडा अधिकारी राजेश मारावार, ॲड. अंजली इंगोले,
क्रीडा अधिकारी भूमरे, गणेश बोडके, खेलो इंडिया
केंद्राचे शेख नफिज बाजंलावार आदी उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान डॉ. अयोध्या तांबिळे
व करण श्रीखंडे यांनी वैद्यकीय सेवा दिली.
हा कार्यक्रम मेरा युवा भारत हिंगोलीचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा, अनिल ढंगे व प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पवन वासनिक, अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव गंगावणे व गजानन आडे यांच्या टीमने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
******
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment