11 March, 2026

आज हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

 

 

* जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहीमेचे उद्घाटन


 

हिंगोली, (जिमाका), दि. 11 : सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथे आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहीमेचे उद्घघाटन करण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस हि अत्यंत सुरक्षित लस आहे. 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वा वाढदिवस न केलेल्या मुलींना पालकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

लसीकरण झालेल्या मुलींना लसीकरण प्रमाण पत्र व पुष्पगुछ देऊन गौरव करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरण करून घेण्याचा पहिला बहुमान कु. वेदिका साहेबराव हराळ हिला मिळाला असून, एकूण 15 मुलींना आज लसीकरण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ पडोळे, डॉ. हराळ व प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी येथील कर्मचारी चमू उपस्थित होता.

 

वसमत येथेही लसीकरण

 

उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे नगराध्यक्ष श्रीमती सुनीता बाहेती यांच्या हस्ते लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसारे, डॉ. सनाउल्ला खान उपस्थित होते.

****** 

No comments: