हिंगोली (जिमाका), दि. 24 : मुख्य कार्यकारी अधिकारी
विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून अंतर विभागीय समन्वय पोर्टल व व्हॉट्सॲप चॅटबोट
सेवेचा आज प्रारंभ येथील षटकोनी सभागृहात करण्यात आला.
अंतर विभागीय समन्वय पोर्टल हे तालुकास्तर व ग्रामस्तरावरील
अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या, मागणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विकसीत करण्यात
आले.
ग्रामस्तरावरील अधिकारी ग्रामसेवक, अंगणवाडी ताई,
मुख्याध्यापक, आरोग्य सहायक व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांना तर अधिकारी गट विकास
अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी,
गट शिक्षणधिकारी यांना आणि जिल्हास्तरावरील अधिकारी संबंधित विभाग प्रमुखांना फायदा
होणार आहे.
व्हॉट्सॲप चॅटबोट नागरिकांसाठी
जिल्हा परिषद हिंगोलीचे व्हॉट्सॲप चॅटबोट विकसित
करण्यात आले असून, यामध्ये नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजना व सोयी सुविधा
घरबसल्या मिळाव्यात, यासाठी 8080467614 या व्हॉट्स अँप क्रमांकावर उपलब्ध राहतील.
या मध्ये प्रमुख्याने जिल्हा परिषदेबद्दल इत्यंभूत
माहिती तसेच केंद्र, राज्य शासन पुरस्कृत योजना, जि प सेस योजनांची संपूर्ण माहिती
सोप्या पध्दतीने मिळू शकेल.
या
व्हॉट्सॲप चॅटबोटचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक
गायकवाड यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment