• हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
• गँस बुकींग प्रक्रियेची दिली माहिती
हिंगोली, दि. १४ (जिमाका): आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरेसा साठा उपलब्धतेबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार (दि.१४) रोजी बैठक पार पडली.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी योगेश मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, निरीक्षण अधिकारी, पोलीस विभाग, सर्व तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील सर्व एजन्सीकडील उपलब्ध गॅस साठा व आवश्यक साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनस्त हिंगोली जिल्ह्यातील एजन्सीकडील दैनंदिन आवश्यक व उपलब्ध साठ्याची नियमित माहिती घेऊन एजन्सींना वेळेत पुरेसा गॅस साठा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. तसेच एजन्सींची तपासणी करून तांत्रिक समस्या असल्यास त्यांचे तात्काळ निराकरण करण्याबाबतही कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
यावेळी गॅस एजन्सींना कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, तसेच ग्राहकांकडे रिकामा सिलेंडर नसताना भरलेले (रिफिल) सिलेंडर देऊ नयेत, अशी सक्त ताकीद देण्यात आली. अशा प्रकारची बाब आढळून आल्यास संबंधितांवर प्रशासनाकडून दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
सध्या हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे घाबरून जाऊन अतिरिक्त गॅस सिलेंडर बुकिंग किंवा साठा करण्याची गरज नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
सर्व ग्राहकांनी केवायसी (KYC) करणे आवश्यक असून त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित गॅस एजन्सीला भेट द्यावी. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी इंडेन, भारत, एचपी या गँस कंपन्याचे आयव्हीआर बुकींग क्रमांक जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये
718955555
7715012345
8888823456
मिस कॉल
8454955555
7718012345
9493602222
व्हॉट्सॲप
7588888824
1800224344
9222201122
मोबाईल अँप
इंडियन ऑईल वन, हँलो बीपीसीएल, एचपी गँस अँपचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातील चौकशी किंवा तक्रारींसाठी नागरिकांनी ९४०३५५९४९४ / ८५४५०८८५४५ / ०२४५६-२२१७०१ / ९४०४६५८५४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
******

No comments:
Post a Comment