27 March, 2026

हिंगोली जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत • विक्रीवरील निर्बंध आदेश रद्द

 

हिंगोली(जिमाका), दि. २७ : हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याने तात्पुरता मागणी-पुरवठा यात असमतोल निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गुरुवार (दि. २६) रोजी पेट्रोल व डिझेल विक्रीवर मर्यादा घालण्याचा आदेश पारित करण्यात आला होता.

मात्र, सद्यस्थितीत बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल तसेच इतर कंपन्यांकडून आवश्यक तेवढा इंधनसाठा जिल्ह्यात उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे इंधन वितरणावरील निर्बंधाची आवश्यकता उरलेली नाही.

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तो (दि.२६) रोजीचा आदेश तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

*****

No comments: