हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रँक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, मागासवर्गीय मुला - मुलींसाठी शासकीय वसतिगृह, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी शासकीय निवासी शाळा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि राजर्षि शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना यासह विविध योजनांचा समावेश आहे.
तसेच मागासवर्गीय मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी शासकीय निवासी शाळा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसचित जाती व मागास प्रवर्गातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे, कार्यालयीन अधीक्षक आत्माराम वागदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, उपसंपादक चंद्रकांत कारभारी आदींची उपस्थिती होती.
*******
.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment