11 March, 2026

समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी 15 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार सत्र 2024-25 व सन 2025-26 या आर्थिक वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्या वर्षासाठी आणि ज्या पुरस्काराकरिता अर्ज करण्यात येणार आहे त्या वर्षासाठी संबंधित पुरस्कारासाठी शासनाने निर्धारित केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर असा विचारात घेण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, सन 2024-25 या वर्षासाठी पात्रतेचा कालावधी 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 असा ग्राह्य धरला जाणार आहे.

इच्छुक संस्था व व्यक्तींनी सदर पुरस्कारांसाठी विहित नमुन्यात अर्ज करून संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात दिनांक 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कारांसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयात उपलब्ध असून, तसेच https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही अर्जाचा नमुना उपलब्ध आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

******

No comments: