·
प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीने
निराकरण करण्याच्या दिल्या सूचना
हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी, धानोरा बंजारा, बरडा, वझर खुर्द
आणि बन या गावांना भेट देऊन विविध शासकीय योजनांची व प्रलंबित कामांची पाहणी केली.
या दौऱ्यादरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामांचा आढावा घेऊन तातडीने
निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या दौऱ्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव
केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, तहसीलदार
सखाराम मांडवगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान संबंधित उपविभागीय
अधिकारी व तहसीलदार यांनी नमूद गावांमधील प्रलंबित ई-केवायसी (नैसर्गिक आपत्ती, पुरवठा,
संजय गांधी योजना) कामांचा आढावा घ्यावा, लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन
त्यांचे निराकरण करावे तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तरांची तपासणी
करावी, अशा सूचना देण्यात आल्या. यासोबतच ई-चावडी, घोषणापत्र-४, ई-हक्क प्रणालीअंतर्गत
तलाठी स्तरावर प्राप्त झालेल्या प्रलंबित अर्जांचा आढावा घेऊन ते निकाली काढावेत तसेच
प्रलंबित ई-फेरफार (नोंदणीकृत व अनोंदणीकृत) प्रकरणांची तपासणी करून महसूल विषयक तक्रारींचे
निराकरण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) हिंगोली यांनी
नमूद सर्व गावांमध्ये रोहयो विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून लाभार्थ्यांना
येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी संबंधित
गावांमधील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करावी, ई-केवायसी कामांचा आढावा घ्यावा व
लाभार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कृषी विभागांतर्गत
राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करावे. तर
अधीक्षक अभियंता, महावितरण यांनी वीज विषयक कामांची पाहणी करून नागरिकांना येणाऱ्या
अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
वरीलप्रमाणे नमूद सर्व कामांचा सविस्तर
आढावा घेऊन अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी
संबंधित गावांतील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला व त्यांच्या
शैक्षणिक गुणवत्तेची व शाळा परिसराची, उपलब्ध सुविधांची पाहणी केली.
*****
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment