10 March, 2026

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल कॅरिअर सेंटर (NCS) हिंगोली आणि सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी, कुर्तडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 13 मार्च 2026 रोजी कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी  येथील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी येथे सकाळी 10 वाजता  पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यामध्ये एल. आर. फार्मासिटीकल्स (परभणी), गोदावरी ड्रग्स लिमिटेड (नांदेड), साई मॅन पॉवर प्लेसमेंट (छत्रपती संभाजीनगर), नवभारत फर्टिलायझर लिमिटेड (छत्रपती संभाजीनगर), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय (भाटेगाव-डोंगरकडा), साई प्रायमरी इंग्लिश स्कूल (वारंगा फाटा), संकल्प जॉब प्लेसमेंट प्रा.लि. (हिंगोली), स्वतंत्र मायक्रो फायनान्स (हिंगोली), चैतन्या इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि. (हिंगोली), भारतीय जीवन विमा निगम (हिंगोली), पलटन सिक्युरिटी फोर्स (हिंगोली), उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (अकोला) आणि युवा परिवर्तन (मुंबई) आदी कंपन्यांचा समावेश आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळांचे माहितीपर स्टॉलही लावण्यात येणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, बी.फार्मा, डी.फार्मा डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी 300 पेक्षा अधिक रिक्त पदांची नोंदणी www.rojgar.mahaswayam.gov.in आणि www.ncs.gov.in या संकेतस्थळांवर करण्यात आली आहे.

उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदांची माहिती  पाहून ऑनलाईन अर्ज करावा. तसेच       दि. 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक मूळ कागदपत्रांसह सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फॉर्मसी, कुर्तडी (वारंगा फाटा–हदगाव रोड, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी  02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

******

No comments: