02 March, 2026

पोलीस पाटील भरती 2026 ची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागांतील पोलीस पाटील भरती 2026 प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची यादी आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.

पोलीस पाटील भरतीसाठीची लेखी परीक्षा दि. 08 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 12 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध उपविभागांमध्ये पार पडल्या.

मुलाखतीनंतर तात्पुरत्या निवडीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आज सोमवार, दि. 02 रोजी www.Hingolipp.recruitonline.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निःपक्षपाती व गुणवत्तेच्या आधारे राबविण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

*****

No comments: