09 March, 2026

आपले सरकार सेवा केंद्र मुलाखतीचा अंतिम निकाल जाहीर

  

·         जिल्ह्यातील 430 आपले सरकार सेवा केंद्रासाठी कागदपत्र पडताळणी 12 ते 18 मार्चदरम्यान

·         निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 430 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि. 3 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या.  या मुलाखत  प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. 9 मार्च 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hingoli.nic.in/ येथे जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीत तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. 12 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 11 वाजता तालुकानिहाय आयोजित केला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

औंढा नागनाथ तालुक्यासाठी दि. 12 मार्च 2026, वसमत तालुका  दि. 13 मार्च 2026, हिंगोली (शहरी व ग्रामीण) तालुका दि. 16 मार्च 2026, सेनगाव तालुका दि. 17 मार्च 2026 आणि कळमनुरी तालुक्यातील मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि. 18 मार्च 2026 रोजी करण्यात येणार आहे.

या कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे वरील नमूद दिनांकास सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 22 डिसेंबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली शहरातील 7 केंद्रे व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील 423 रिक्त केंद्रे अशा एकूण 430 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी दि. 2 जानेवारी 2026 अखेर एकूण 3101 अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या 1861 उमेदवारांच्या दि. 3 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

या मुलाखत प्रक्रियेचा अंतिम निकाल दि. 9 मार्च 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://hingoli.nic.in/ येथे जाहीर करण्यात आला आहे. मुलाखतीत तात्पुरत्या स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दि. 12 ते 18 मार्च 2026 या कालावधीत सकाळी 11 वाजता तालुकानिहाय आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केले आहे.

********

No comments: