10 March, 2026

महिला दिनानिमित्त पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची बालगृहास भेट

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह, सावरकर नगर, हिंगोली येथे पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी भेट देऊन बालिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या हस्ते बालिकांना पुस्तके, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांनी बालिकांशी संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व, आत्मविश्वास आणि स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमलत्ता जगताप, श्री. शेख तसेच इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला बालगृहाचे अधीक्षक शंकर घ्यार, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे व संगीता दुबे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बालगृहातील एका बालिकेने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे यांनी केले.

*****

No comments: