30 March, 2026

जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांबाबत दोषी कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा परिषद हिंगोलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई प्रतिदिन 55 लिटर प्रमाणे शुद्ध व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने जिल्ह्यात एकूण 619 नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित योजनांची कामे कंत्राटदारांना ब-1 करारावर देण्यात आली असून कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली मुदत संपूनही काही कंत्राटदारांकडून कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. वारंवार सूचना देऊनही कामे पूर्ण न करणाऱ्या अशा एकूण 68 कामांच्या कंत्राटदारांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसमध्ये संबंधित कंत्राटदारांना 31 मार्च 2026 अखेरपर्यंत अपूर्ण कामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नोटीस प्राप्त होऊनही कामे पूर्ण न केल्यास ब-1 करारातील अटी व शर्तींनुसार संबंधित कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी दिला आहे.    

 

******

No comments: