हिंगोली (जिमाका), दि. 10 : राष्ट्रीय
सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्यामार्फत नवीन सेवार्थ प्रणाली अंतर्गत अधिकारी-कर्मचारी
वेतन देयके, भत्ते व निवृत्तीवेतन संबंधित देयके तयार करणे, कर्ज व अग्रिमे तसेच आयकर
प्रणाली आदी कामकाजासाठी अद्ययावत सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीच्या
अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याबाबत संचालक,
लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सूचित केले आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आहरण
व संवितरण अधिकारी तसेच त्यांच्या कार्यालयातील वेतन देयक व लेखाविषयक कामकाज पाहणारे
अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली कोषागार कार्यालय व जिल्हा मुख्यालय स्तरावरील
आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दि. 11 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते
2 या वेळेत शासकीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षण हॉल, हिंगोली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
तसेच उपकोषागार कार्यालय वसमत, कळमनुरी,
सेनगाव व औंढा नागनाथ स्तरावरील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी
दि. 12 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत शासकीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
प्रशिक्षण हॉल, हिंगोली येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचेही कोषागार कार्यालयाने
कळविले आहे.
संबंधितांनी स्वतः उपस्थित राहून प्रशिक्षणाचा
लाभ घ्यावा, असे आवाहन कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment