30 March, 2026

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सर्व विभागाकडून सत्कार.

 


हिंगोली (दि. 30 ) महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी '१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम' अंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात आला असून, हिंगोली जिल्ह्याने यामध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद येथील सभागृहातील आयोजित एका बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार सर्व विभाग प्रमुखा मार्फत करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) विजय बोराटे, उपशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के प्राथमिक शिक्षण अधिकारी आशावरी काळे आदी अधिकारी उपस्थित होते

******

No comments: