30 March, 2026

हिंगोली जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सन 2022-2023 ते सन 2024-2025 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी  विवरणपत्र प्रणालीद्वारे तयार करण्यात आले आहे.

भविष्य निर्वाह निधी  विवरणपत्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुलभरित्या उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ते www.zphingoligpf.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

******

No comments: