25 March, 2026

मोफत गुडघा व नितंब प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : मुख्यमंत्री वैद्यकीय‌ सहाय्यता निधी अंतर्गत आयोजित करण्यात आलेले मोफत गुडघा व नितंब  प्रत्यारोपण शस्त्रक्रिया शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाले. ममता आणि मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने तसेच संजीवनी ममता हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात एकूण 70 रुग्णांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 26 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक त्या उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच गरजू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनात डॉ. अन्सारी, डॉ. दिपेन शर्मा, आवैज खान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन भोसले, समाजसेवा अधीक्षक डॉ. संतोष शेंडगे, सोमनाथ वानखेडे व आदिल खान यांचे विशेष योगदान राहिले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत लाभदायक ठरले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

*** 




No comments: