07 August, 2023

 

हर घर तिरंगा 2.0 अभियानांतर्गत डाक घरातून राष्ट्रध्वज खरेदी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीयस्तरावर हर घर तिरंगा 2.0 हे अभियान दि. 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे.

हर घर तिरंगा या अभियानांतर्गत भारतीय डाक विभागामार्फत परभणी विभागातील परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यातील मिळून सर्व 37 डाक कार्यालयात राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असतील. हे राष्ट्रीय ध्वज 20x30 (इंच) या आकारात 25 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहेत. यासाठी जीएसटी नाही. ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ऑनलाईन ई-पोस्ट ऑफिस पोर्टलवर दि. 12 ऑगस्ट, 2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत राष्ट्रध्वज बुक करता येतील. एका व्यक्तीस जास्तीत जास्त पाच राष्ट्रीय ध्वज विकत घेता येतील.

राष्ट्रध्वजाचा सम्मान राखत सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा 2.0 अभियानांतर्गत डाक घरातून राष्ट्रध्वज खरेदी करण्याचे आवाहन परभणी डाक विभागाचे अधीक्षक डाक घर मोहम्मद खदीर यांनी केले आहे.

*****

No comments: