09 August, 2023

 

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

ऑनलाईन स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या तर्फे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 12ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान खालील प्रमाणे विवीध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयात दि. 12 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. एचआयव्ही/एडसबाबत शपथ वाचन करण्यात येऊन उपस्थितानां एचआयव्ही/एडसबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. हिगोली बसस्थानक व मुख्य चौकात एचआयव्ही/एडसबाबत माहितीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रेड रिबन क्लव असणाऱ्या महाविद्यालयात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हयातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि. 12 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन स्पर्धा. रिल मेकींग स्पर्धा ( 30 सेकंद ते 1 मिनीटाचे रिल) घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रथम विजेत्यास 5 हजार रुपये, द्वितीय विजेत्यास 3500 रुपये आणि तृतीय विजेत्यास 2 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

            या स्पर्धेसाठी एचआयव्ही चा प्रसार कसा होतो, कलंक व भेदभाव, नॅको एड्स अॅप किंवा 1097 टोल फ्री क्रमांक यांचे फायदे, एचआयव्ही तपासणी करण्यास परावृत्त करणे हे विषय ठेवण्यात आले आहेत.

उपरोक्त स्पर्धेसाठी 17 ते 25 वयोगटातील इच्छुक स्पर्धकांनी  दि. 12 ऑगस्ट ते दि. 25 ऑगस्ट, 2023 व्हॉट्सअपच्या आरआरसी ग्रुपवर पोस्ट करावी किंवा 9420464455  या व्हॉटसअप नंबरवर पाठवावेत.

जिल्हा रुग्णालयातील डापकू सभागृहात दि. 4 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 12 वाजता समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            या कार्यक्रमासंबंधी काही अडचन असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास ज्ञानेश्वर चौधरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तथा जिल्हा पर्यवेक्षक, डापकु, जि.रु. हिंगोली मो. 9420464455 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

******

No comments: