13 August, 2023

 *हिंगोली जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानास उत्साहात सुरुवात*

 

▪जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण

 





हिंगोली (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात हर घर तर रंग अभियानास उत्साहात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाचही पंचायत समिती मुख्यालयात हर घर तिरंगा अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे उपविभागीय कार्यालये, तालुका कार्यालये

तसेच 563 ग्रामपंचायती, सर्व जिल्हा परिषद शाळामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. दिनांक 14 व 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत स्वतः चे घरावर तिरंगा ध्वज फडकावून सेल्फी घ्यावा.तो सेल्फी केंद्र शासनाच्या वेबसाइईटवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी केले आहे.


*हिंगोली पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण* 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत मेरा माटी मेरा देश उपक्रम हर घर तिरंगा अभियान अंतर्गत हिंगोली पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी विष्णू भोजे, सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय पांडे , सहाय्यक लेखाधिकारी श्याम बांगर, कृषि विस्तार अधिकारी पुंडगे, विस्तार अधिकारी (सां ) तुप्पड विस्तार अधिकारी(पंचायत ) शितळे, गायकवाड, सोनटक्के , वायभासे भगत, आटेकर इतर कर्मचारी उपस्थित होते. 

*वसमत पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण* 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमांतर्गत मेरा माटी मेरा देश उपक्रम हर घर तिरंगा अभियान अंतर्गत वसमत पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. त्या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील अंभुरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी दिलीप चिलगर , गटशिक्षणाधिकारी एस. सोनटक्के, सहाय्यक लेखाधिकारी राहुल बोईनवाड , कनिष्ट प्रशासन अधिकारी अफरोज कादरी, विस्तार अधिकारी पंचायत तुशीराम कोकरे, गोलेवार, विस्तार अधिकारी कृषी पांचाळ, बोचरे तसेच हरी येलपूला, बळवंते,देशमुख मॅडम व सेवक तसेच उपअभियंता बालविकास प्रकल्प अधिकारी, पशु संवर्धन अधिकारी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******

No comments: