07 August, 2023

 

"सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय तपासणी शिबीरात

जिल्ह्यातील माजी सैनिकांची आरोग्य तपासणी

 




हिंगोली (जिमाका), दि. 07 : महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक 01 ऑगस्ट "महसूल दिन व दि. 1 ते 7 ऑगस्ट, 2023 या कालावधीत महसून सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 05 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत "सैनिक हो तुमच्यासाठी" कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्ह्यातील सेवारत सैनिक, सेवानिवृत सैनिक, अधिकारी, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीर माता, वीर पीता, वीर पत्नी यांच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमांतर्गत महसूल सप्ताहात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.   

                याप्रसंगी उपस्थित आजी/माजी सैनिक विधवा यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर शेती विषयक, जमिनी विषयक वाद, पांदण रस्ते, 20 गुंठे शेतीविषयी अडीअडचणी मांडल्या. याबाबत जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी सर्वाच्या आडचणी सोडविण्यासाठी आपण कागदपत्राचा पठपुरावा करावा. या सर्व अडचणी लवकरात लवकर सोडवू, असे सांगितले. ज्या सैनिकांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरु शकत नाहीत. त्यांचे जी छोटे-छोटे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आपण मदत करु, असे आश्वासन दिले.

 यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आजी/माजी सैनिक यांच्या आडचणी जाणून घेतल्या व आडचणी कशाप्रकारे सोडविल्या जातील या बाबत मार्गदर्शन केले.

 या शिबिरात जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील शिबिरीसाठी उपस्थित वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सेवारत सैनिक, सेवानिवृत सैनिक, अधिकारी, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीर माता, वीर पीता, वीर पत्नी अशा 116 जणांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. तसेच त्यांच्या अडीअडचणी मांडल्या.

****

No comments: