17 August, 2023

 

राज्य राखीव पोलीस बलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या

गोळीबार सरावासाठी मौजे वगरवाडी येथील क्षेत्र उपलब्ध

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराष्ट्र जमीन  महसूल  अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील  कलम 33 (1) (ख) व (प)  नुसार मौजे  वगरवाडी  ता. औंढा, जि. हिंगोली  येथील फायरींग रेंज सर्वे नं. 25 व 29 या परिसरात  दि. 16 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट, 2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्र.12, हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी  व पोलीस अंमलदार यांचा सन 2023-24 मधील वार्षिक गोळीबाराचा सराव घेण्यासाठी  परवानगी  देण्यात येत आहे.

            या कालावधीत पुढील अटीवर गोळीबार  सरावासाठी  मैदान उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. हे ठिकाण  धोकादायक  क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे. परिसरात  गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सूचना  पोलीस अधिकारी यांनी  दवंडीद्वारे  व ध्वनीक्षेपकाद्वारे  संबंधित  गावी सर्व संबंधितांना  द्याव्यात. तसेच तहसीलदार औंढा नागनाथ व पोलीस  स्टेशन हट्टा यांनी मौ. वगरवाडी  फायरींग बट परिसरात  दवंडीद्वारे व ध्वनीक्षेपकाद्वारे  या आदेशाची  प्रसिध्दी  करावी, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: