15 August, 2023

स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर उद्यानातील शिलाफलकाचे

मान्यवरांच्या हस्ते अनावरण





 

 

  • आजादी का अमृत महोत्सव व माझी माती माझा देश अभियानांतर्गत काढलेल्या वृक्षदिंडीस उत्स्फूर्त प्रतिसाद
  • उपस्थित मान्यवरांनी हातात दिवे घेऊन घेतली पंचप्रण शपथ
  • खा.हेमंत पाटील,आ.मुटकुळे, जिल्हाधिकारी पापळकर व उपस्थित मान्यवरांनी केले वृक्षारोपण

 

हिंगोली (जिमाका),दि. 15 :  आजादी का अमृत महोत्सव आणि माझी माती माझा देश अभियानांतर्गत देवडा नगर येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर उद्यानात उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक पोर्णिमा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, माजी आमदार गजानन घुगे, उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजी पाईकराव, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, मुध्याधिकारी अरविंद मुंढे उपस्थित होते.    

यावेळी स्वातंत्र दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते देवडा नगर येथील स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर उद्यानापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्ष दिंडीमध्ये शाहीर धम्मानंद इंगोले यांच्या चमूने गिताच्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरणासंबंधी जागर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ही वृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी उगम संस्थेचे जयाजी पाईकराव, सुशांत पाईकराव यांनी परिश्रम घेतले. या वृक्षदिंडीमध्ये वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्य सैनिक अण्णाराव टाकळगव्हाणकर उद्यानात असलेल्या हुतात्मा स्मारकाला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

शिलाफलकाच्या अनावरण कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेतली. या शपथ कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारक उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 

 **** 

No comments: