10 August, 2023

 

जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राच्या वतीने

येहळेगाव तुकाराम येथे मेरी माटी मेरा देश उपक्रम

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्हा प्रशासन व नेहरु युवा केंद्राच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट रोजी आदर्श ग्राम पंचायत येहळेगाव तुकाराम या गावी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या पंचप्राणावर आधारित असलेला मेरी माटी-मेरा देश मिट्टी को नमन वीरो को वंदन हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी विद्यार्थ्यांना मेरी माटी, मेरा देश ची शपथ देण्यात आली. त्याच बरोबर दिवे लावून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. गावातील स्वातंत्रवीरांचा, वीर माता भगिनींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक प्रवीण पांडे यांनी आजचा युवक हा भविष्याचा नागरिक आहे आणि आपण सर्वांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपलं सहकार्य राष्ट्रकल्याणासाठी द्यावं असे मनोगत व्यक्त केले. क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात वृक्षारोपण अभियान राबवले.

या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून स्वातंत्र्यसेनानी मारुतीराव चंद्रकांत काळे, वीर माता शांताबाई अनंतराव काळे, शहीद सैनिकांचे बंधू गणेशराव काळे, शाळेचे मुख्याध्यापक शेळके, ग्रामविकास अधिकारी शिंदे, क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी सुमित दोडल, वैद्यकीय अधिकारी राठोड, पशुवैद्यकीय अधिकारी भोसले, घोटा गावचे सरपंच रावसाहेब पाईकराव, नेहरु युवा केंद्राचे युवा समन्वयक प्रवीण पांडे, सुरेशराव नागरे, रेणुकाई क्रीडा मंडळाचे संस्थापक रणवीर तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन महेश खाडे यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी केली.

*****

No comments: