18 August, 2023

 

औढा नागनाथ  येथे केंद्र सकारची 9 वर्षे- सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची

या विषयावर मल्टिमिडीया चित्र प्रदर्शनाचे आयोजन

 

·         जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या वतीने विविध योजनांचे स्टॉल्स उभारणार

 



हिंगोली (जिमाका), दि.18 : केंद्र सरकाच्या सेवेला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मेरी माटी मेरा देश अभियानाच्या  औचित्याने केंद्र सरकारची 9 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची या संकल्पनेवर अधारित  सरकारच्यावतीने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली उलेखनीय कामगिरी आणि देशाचा जलदगतीने केलेला विकास  तसेच  जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या  नवनवीन योजनांची माहिती  या मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या माध्यमातून  देण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या  नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या( Central Bureau of Communication)  वतीने व राज्य शासन आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग  मंदिर संस्थान, औढा नागनाथ यांच्या सहकार्याने भक्त निवास,क्र. 2 नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर औढा नागनाथ  येथे तीन दिवसांकरिता मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

            हे प्रदर्शन दिनांक 20 ते 22 ऑगस्ट,2023  दरम्यान सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी  मोफत खुले  राहणार आहे. यावेळी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.

या चित्र प्रदर्शनात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या वतीने स्टॉल्सच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती आणि सेवा  देण्यात येणार आहे. तसेच सांसकृतिक कार्यक्रम आणि विविध शाळांमध्ये मेरी माटी मेरा देश अभियानानिमित्त  पोष्टर  स्पर्धा घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते होणार असून यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,  जि.प. मा.उपाध्यक्ष मिलिंद यंबल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) गणेश वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खूने, नादेंड येथील नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी. एल. अलुरकर, तहसीलदार तथा अध्यक्ष नागेश्वर ज्योतिर्लिग मदिर संस्थान विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी बालाजी गोरे, औढा नागनाथ नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा गोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती इंगळे, नागेश्वर ज्योतिर्लिंग संस्थांचे अध्यक्ष वैजनाथ पवार,  प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी  भेट देण्याचे आवाहन प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये व सहायक प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल यांनी केले आहे.

*****

No comments: