04 August, 2023

 

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमांतर्गत

 वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन

हिंगोली, दि.4 : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या दिनांक 25 जुलै, 2023 च्या शासन निर्णयानुसार महसूल विभागामार्फत दिनांक 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट, 2023 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व सेवारत व सेवानिवृत्त सैनिक/अधिकारी/आजी/माजी सैनिक/माजी सैनिक पत्नी/विधवा/वीरमाता/वीर पिता/वीर पत्नी यांना कळविण्यात येते की, शनिवार दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबीरात अस्थिरोग तपासणी, नेत्र,कान-नाक-घसा तपासणी, स्त्री रोग तपासणी, रक्त व लघवी, दंत, ईसीजी,फिजीओथेरेपी तपसणी आदि तपासणी करण्यात येणार आहे.

 तरी या कार्यक्रमाचा व मेडीकल चेकअप कॅम्पचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी/माजी सैनिक पत्नी/विधवा/वीरमाता/वीर पिता/वीर पत्नी यांनी लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: