10 August, 2023

 

जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची विविध उपक्रमांद्वारे प्रभावी अंमलबजावणी करावी

- अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : स्वीप कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी जाहिरात फलक, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, बॅचेस, बसस्थानकावर जिंगलद्वारे प्रसिध्दी, सिनेमागृहात चित्रफीतीद्वारे जनजागृती यासह विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी बैठकीत दिले.

                स्वीप कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, शिक्षणाधिकारी माधव सलगर, संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी, सुखदेव देठे, बालाजी काळे, दिपक कोकरे, विजय बांगर, अण्णासाहेब कुटे, अशोक भोजने, अनिल पाटील उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांच्याकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित झालेला आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रमातून मतदारांची जनजागृती करण्याचे निर्देश प्राप्त झाले असल्याचे सांगून स्वीप कार्यक्रमाची रुपरेषा प्रस्तावित केली. त्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये सुरु असून त्यामध्ये नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी सर्व तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करुन नवमतदारांची जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात यावी. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या स्तरावर उपविभागीय अधिकारी हे रॅलीचे आयोजन करतील. त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व प्राचार्यांची बैठक घेतील. एनजीओ व युवक मंडळ संघटना उपस्थित राहतील. जास्तीत-जास्त नागरिक व युवक यांचा सहभाग करुन घेणे क्रमप्राप्त आहे. तहसील ओढा ना. व सेनगाव यांच्या स्तरावर तहसीलदार हे रॅलीचे आयोजन करतील. रॅली आयोजनाचा कार्यक्रम दिनांक 18 ऑगस्ट, 2023 रोजी पार पाडण्यात यावा. या रॅलीच्या आयोजनाची माहिती पोलीस प्रशासनास कळवावी. या रॅलीमध्ये मतदार नोंदणीसाठी  घोषवाक्याद्वारे जनजागृती करुन यांची जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी दिल्या.

मतदार जनजागृतीबाबतचे बॅनर जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, दवाखाने, महत्वाचे शासकीय कार्यालय, आठवडी बाजार स्थळ इ. महत्वाचे ठिकाणी जाहिरात फलक (बॅनर / होर्डींग) लावण्यात यावे. जिल्ह्यांतील मतदानांची टक्केवारी मध्ये वाढ करण्यासाठी वंचित घटक, तृतीय पंथी, भटक्या जमाती, आदिवासी यांचे वाडी, वस्ती, तांडा येथे आपआपल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदार यांनी विशेष मोहीमेचे आयोजन करुन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याबाबत सुचित केले आहे. दिव्यांग मतदारांची जास्तीत जास्त मतदार म्हणुन नाव नोंदणी करण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्याकडुन यादी उपलब्ध करून घेऊन नोंदणी न झालेल्या मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यात यावी. जिल्ह्यातील साप्ताहीक आठवडी बाजार येथे मतदार जनजागृती विषयांचे ऑडीओ जिंगलव्दारे जनजागृती करावी. जिल्ह्यातील शाहीर, पथनाट्यकार यांच्याकडुन विविध गाणी, गीत व पथनाट्य याव्दारे जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात यावी व मतदार टक्केवारी वाढीसाठी जनजागृती करावी. जिल्हा स्तरावरील स्वीप समितीच्या सहाय्यासाठी शहरी भागाकरिता नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना व तालुका स्तरावरील ग्रामीण भागासाठी नोडल अधिकारी म्हणुन गट विकास अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बॅनर, व्हिडीओ, टोप्या इ. साहित्याची उपलब्धता करुन देण्यात यावी. चित्रपटगृहात मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडुन आलेले व्हिडीओ चित्रपटाच्या सुरुवातीला दाखविण्यात यावे. मंडळ अधिकारी यांच्या गावामध्ये (मंडळ अधिकारी एकुण गावे 40) बॅनर्स लावावेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर, अशा समाजमाध्यमाव्दारे मतदार जनजागृती करावी. साईन मोव्हमेंट सेल्फी पॉईंट तयार करावेत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी  दिल्या.

****

No comments: