11 August, 2023

 

दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत

टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : दूध व दुग्धजन्य पदार्थातील होणारी दुधातील भेसळ रोखण्यासाठी  आज दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी  हे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापनशास्त्र हे राहणार आहेत. तर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी परभणी/हिंगोली यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे.

या जिल्हास्तरीय गठीत समितीद्वारे जिल्ह्यातील जनतेस, दूध ग्राहकास स्वच्छ व निर्भेळ दूध मिळणाच्या दृष्टिकोनातून गुणवत्तापूर्वक दूध पुरवठा होण्याच्या अनुषंगाने हिंगोली जिल्हास्तरीय गठीत समितीमार्फत भेसळ युक्त दुध तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात दुधामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास जिल्हा समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत. यासाठी टोल फ्री क्रमांक : 7028975001, 9834106663 या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती, परभणी/हिंगोली यांनी केले आहे.  

*****

No comments: