11 March, 2024

शासन आपल्या दारी' महारोजगार मेळाव्यात 160 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची निवड

हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटरमार्फत 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 160 सुशिक्षित बेरोजगारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी , पदवीधारक पात्रतेचे 517 उमेदवार उपस्थित होते. या 517 उमेदवारांपैकी 160 उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे. 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत दोन लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. या मेळाव्यात आत्मनिर्भर फॅसिलिटी मॅनेजमेंट हिंगोली, समर्थ ट्रॅक्टर हिंगोली, मनसा मोटर्स (महिंद्रा व टाटा मोटर्स) हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरंन्स हिंगोली, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, पिपल ट्री ऑनलाईन छत्रपती संभाजी नगर, नवभारत फर्टीलायझर छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, कार्यालयातील कर्मचारी न. द. टोनपे, म. ना. राऊत, म. शां. लोखंडे, रा.द.कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: