06 March, 2024

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि 06 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली या कार्यालयामार्फत शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दि. 10 मार्च, 2024 रोजी येथील रामलीला मैदानावर पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रोजगार मेळाव्यात आत्मनिर्भर फॅसिलिटी मॅनेजमेंट हिंगोली, पिपल ट्री ऑनलाईन छत्रपती संभाजीनगर, समर्थ ट्रॅक्टर हिंगोली, मनसा मोटर्स (महिंद्रा व टाटा मोटर्स) हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरंस हिंगोली, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि.हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली या कंपन्या सहभागी होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 500 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in किंवा www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह रामलीला मैदान हिंगोली येथे दि. 10 मार्च, 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने उपस्थित रहावेत. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. ******

No comments: