15 March, 2024

महामंडळाची कर्ज योजना दिव्यांगांकडून लाभासाठी अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 15 :राज्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राज्य शासनाची वैयक्तीक थेट कर्ज योजना व राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येतात. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचे अर्ज महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावर डाऊनलोडमध्ये आहेत. तर महामंडळाचे माहितीपत्रक https://mshfdc.co.in/index.co.in/index.php/2013-04-12-13-20-56 या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ (म.) हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments: