09 March, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि 09 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या रविवार, दि. 10 मार्च, 2024 रोजी हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दि. 10 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने हिंगोली हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता हिंगोली हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता हिंगोली जिल्हा-शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती. सांय. 4.30 वाजता हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील. ******

No comments: