11 March, 2024

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सवलतीच्या कर्जाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण

हिंगोली (जिमाका), दि.11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांच्यासाठी एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप बुधवार, (दि.१३) रोजी दुपारी ४ वाजता कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, नगर परिषद, हिंगोली येथे करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ या महामंडळाचा समावेश आहे. लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी SU-RAJ या राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच सोव्हर आणि सेफ्टीक टँक कामगारांसाठी आयुष्मान हेल्थकार्डचे व पीपीई साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांना संबोधित करणार आहेत. तरी संबंधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. *****

No comments: