06 March, 2024

सैनिक कल्याण विभागाच्या सरळ सेवेतील गट-क पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 24 मार्चपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि 06 : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची रिक्त पदे भरण्यासाठी दि. 03 मार्च, 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. परंतु लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 24 मार्च, 2024 रोजी सांय. 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभ सर्व माजी सैनिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments: