19 March, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान केंद्रांची जिल्हा निवडणूक अधिका-यांकडून पाहणी

हिंगोली, (जिमाका) दि. १९ : लोकसभा सार्वत्रिक निवढणूक २०२४ च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीसाठी हिंगोली शहरातील निश्चित करण्यात आलेले मतदान केंद्राची प्राथमिक पाहणी केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हिंगोली नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी अरविंद मुंढे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे तसेच तहसिल व नगरपरिषदेचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पापळकर यांनी पाहणी व निश्चित केलेल्या मतदान केंद्रांमध्ये मतदानाच्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल २०२४ रोजी मतदारांना उपलब्ध करून देण्याच्या सोयीसुविधांबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच या सोयीसुविधांची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे निर्देशही यावेळी यंत्रणेला दिले. ***

No comments: