19 March, 2024

हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराने नियमांचे पालन करावे - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराने नियमांचे पालन करावे - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हिंगोली (जिमाका), दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 15- हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराने आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आदेश निर्गमित केले आहेत. हिंगोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडली जावी. या दृष्टिकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराने खालील नियमांचे पालन करावे. नामनिर्देशन अर्ज दाखल करते वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी यांच्या कार्यालयात येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश दि. 6 जून 2024 पर्यंत लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. *******

No comments: